Sun, March 26, 2023

डॉ. कलमाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
डॉ. कलमाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
Published on : 13 February 2023, 1:37 am
पुणे, ता. १३ ः डॉ. कलमाडी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. ‘परिवर्तन’ या विषयावर आधारित इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नाटुकले, गाणी, नृत्याचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राखी शेट्टी, देविका नाडीग होत्या. या स्नेहसंमेलनास कुशल हेगडे, इंदिरा सालीयन, राधिका शर्मा, चंद्रहास शेट्टी, बालाजी शेट्टी, चंद्रकांत हरकुडे, जयश्री पै, उमेश नेवसे आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन झाले. सूत्रसंचालन पूनम नाडकर्णी आणि अर्चना काजळे यांनी केले.
-------