शिंदे, फडणवीस, गडकरी यांच्या सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे, फडणवीस, गडकरी यांच्या सभा
शिंदे, फडणवीस, गडकरी यांच्या सभा

शिंदे, फडणवीस, गडकरी यांच्या सभा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ‘कसबा’ हा पहिल्यापासूनच भाजपचा किल्ला राहिला आहे. आताच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही सूक्ष्म स्तरांवर नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासकामे ही जनतेपर्यंत पोचली आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही पदयात्रा, कोपरा सभा, मेळावे आदींचे नियोजन केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व अन्य मित्र पक्षांच्या वतीने हेमंत रासने हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या प्रचाराचे नियोजन व येणाऱ्या दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या होणाऱ्या सभा या विषयी माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह सहयोगी पक्षांचे संजय आल्हाट, शैलेंद्र चव्हाण, बालाजी चव्हाण, बालाजी पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक हिंदुत्व विरुद्ध काँग्रेस
राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु आहे. संजय राऊत हे नाना पटोले यांच्यावर टीका करीत आहेत. आमदार प्रणिती शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात सुरु असलेला वाद यावरून महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे समजते. अशीच परिस्थिती कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे कसब्यात गेले आहे. त्यामुळे कसब्याची निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही तर हिंदुत्व विरुद्ध काँग्रेस अशी आहे. काँग्रेसने नेहमीच हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

यांच्या सभा होणार
हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे, तसेच मंत्री गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, पाशा पटेल, आमदार शिवेंद्र राजे भोसले आदींच्या सभा होणार असल्याची माहिती होळ यांनी दिली.