बोपदेव घाटात प्रेमी युगलाला लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोपदेव घाटात प्रेमी युगलाला लुबाडले
बोपदेव घाटात प्रेमी युगलाला लुबाडले

बोपदेव घाटात प्रेमी युगलाला लुबाडले

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या युगलांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. चोरट्यांनी रविवारी दुपारी एका प्रेमी युगलास मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुबाडल्याची घटना घडली.

कोंढवा येथील एका २४ वर्षीय तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार टेबल पॉइंटवर रविवारी दुपारी दीड वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा त्याच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवर बोपदेव घाटात गेला होता. ते टेबल पॉइंट येथून निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यासमोर दुचाकी आडवी उभी करून थांबण्यास भाग पाडले. तरुणाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून ते पसार झाले.