Tue, March 28, 2023

कोथरूडमधील शिबिरात
१२५ रक्तदात्यांचा सहभाग
कोथरूडमधील शिबिरात १२५ रक्तदात्यांचा सहभाग
Published on : 14 February 2023, 4:30 am
पुणे, ता. १४ ः कोथरूड येथील वनाझ इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीचा अमृत महोत्सव तसेच वनाझ कामगार संघटनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित शिबिरात १२५ दात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन वनाझ इंजिनिअर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष एस. जे. विसपुते व वनाझ कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत कदम यांच्या हस्ते झाले. गेली २५ वर्षे संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे. शहरातील बहूतेक रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली. कंपनीचे अधिकारी विजय चक्के, अमित वाघ, तसेच संघटनेतर्फे उपाध्यक्ष विजय डेरे, जनरल सेक्रेटरी तुषार चौधरी, सहसेक्रेटरी महेश धावडे, खजिनदार राजेश पवार, सहखजिनदार अमित केसवड व संघटक हनुमंत धुमाळ यांनी शिबिर संयोजनात भाग घेतला.
---------------