
योगी अरविंद सांस्कृतिक मंचातर्फे व्याख्यानमाला
पुणे, ता. १५ : श्री योगी अरविंद सांस्कृतिक मंचाच्या वतीने शुक्रवार (ता. १७) पासून तीन दिवसीय सामाजिक समरसता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकारनगर येथील गल्ली क्रमांक दोनमधील प्रताप सोसायटीतील श्री योगी अरविंद सांस्कृतिक मंचाच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी ‘संत आणि सामाजिक समरसता‘ या विषयावर विद्यावाचस्पती कल्याणी नामजोशी यांचे व्याख्यान होणार आहे, तर शनिवार (ता. १८) रोजी स्वातंत्रवीर सावरकर आणि सामाजिक समरसता’ या विषयावर अभिनेता शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवारी (ता. १९) व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांच्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक समरसता’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
----------