उद्योजक महिला परिषदेचे पाच मार्चला आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक महिला परिषदेचे
पाच मार्चला आयोजन
उद्योजक महिला परिषदेचे पाच मार्चला आयोजन

उद्योजक महिला परिषदेचे पाच मार्चला आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे यंदा ५ मार्च २०२३ रोजी ‘राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद’ होणार आहे. ही परिषद मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातील बी. एन. वैद्य सभागृहात (हिंदू कॉलनी, दादर पूर्व) आयोजित केली आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे गेली २४ वर्षे संपूर्ण दिवसाची परिषद मुंबईत भरविण्यात येते. ही परिषद सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातून महिला उद्योजक संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद परिषदेत सहभागी होणार आहेत. जवळपास एक हजार महिला उद्योजक या परिषदेत सहभागी होणार आहेत. सकाळी नऊ ते दहा वाजता नाव नोंदणी, सकाळी १० ते ११ या वेळेत परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर ‘शासकीय योजना व उद्योगसंधी’, ‘उद्योगाचे तंत्र आणि मंत्र’ ही चर्चासत्रे आणि ‘आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्कार वितरण समारंभ’ असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी दिली आहे.
या प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून महिलांमध्ये उद्योजकतेचे बीज वाढविण्याच्या दृष्टीने काम केले जाते. त्यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, उद्योजकता कौन्सिलिंग, अभ्यास दौरे, परिषद यांचे आयोजन केले जाते. महिला उद्योजकांनी बनविलेल्या विविध उत्पादनांना प्रदर्शनांद्वारा बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असेही मोहाडीकर यांनी सांगितले.