संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी भारतीय बनावटीचे किट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी भारतीय बनावटीचे किट
संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी भारतीय बनावटीचे किट

संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी भारतीय बनावटीचे किट

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘मल्टी ड्रग्ज रेझिस्टंट’ क्षयरोग (एमडीआर-टीबी), एम ट्यूबरक्यूलॉसीस कॉम्प्लेक्स (एमटीबी), हेपॅटायटीस बी व्हायरस (एचबीव्ही), हपॅटायटीस सी व्हायरस (एचसीव्ही), त्याच प्रमाणे जनुकीय विश्लेषणसारख्या संसर्गजन्य रोगांचे निदान आता भारतीय बनावटीच्या ‘आरटी-पीसीआर’ किटच्या माध्यमातून होणार आहे. मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स आणि थर्मो फिशर सायंटिफिक इंक यांच्या भागिदारीतून हे किट निर्माण होणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. अप्लाईड बायोसिस्टीम्स टाकपाथ पीसीआर किटला ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (सीडीएससीओ) यांनी परवाना दिला आहे.
देशात क्षयरोग, एचआयव्ही, व्हायरल हेपॅटायटीस अशा सार्वजनिक आरोग्यापुढील गंभीर समस्या आहेत. या संसर्गजन्य रोगांच्या निर्मूलनासाठी त्यांचे वेळेत निदान होणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. त्यासाठी ‘आरटी-पीसीआर’ किट आवश्यक असते. देशातील क्षयरोग, एड्स, विविध प्रकारच्या काविळ अशा संसर्गजन्य रोगांच्या अचूक निदानामध्ये मायलॅब आघाडीवर आहे. थर्मो फिशर सायंटिफिक इंकच्या भागिदारीतून देशासह जगाच्या वेगवेगळ्या भागात रोगनिदानाची संख्या वाढविण्याचा उद्देश आहे.
मायलॅब डिस्कव्हररी सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, “भारतीय बनावटीच्या रोगनिदान चाचणी निश्चित उपयुक्त ठरेल. रुग्णांच्या अचूक रोगनिदानासाठी प्रयोगशाळांना विश्लेषणासाठी विशिष्ट प्रकारच्या साधनांनी मदत करणार आहोत. भारतीय बनावटीच्या टेस्ट किटच्या माध्यमातून प्राणघातक संसर्गजन्य आजाराचे देशातून उच्चाटन करण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचा आमचा उद्देश आहे.”
जेनेटिक सायन्सेस ग्रुप अँड स्पेशालिटी डायग्नॉस्टिक ग्रुप व थर्मो फिशर सायंटिफिकचे संचालक जगजित सिंग अंतक म्हणाले, “संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. रोग प्रतिबंधक लसीकरण, निदान तंत्र, उपचारात प्रगती झाली आहे. या रोगांचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी देशासमोर अद्यापही मोठे आव्हान आहे. आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित बनविण्यासाठी सक्षम करण्यासाठी नवीन कल्पना देण्यात वचनबद्ध आहोत.”