Tue, March 28, 2023

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना
पीएमपी बसमध्ये विविध सुविधा
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपी बसमध्ये विविध सुविधा
Published on : 16 February 2023, 2:22 am
पुणे, ता. १६ ः दहावी व बारावीच्या परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत पीएमपीच्या बसमध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. यात परीक्षार्थींना ७५० रुपयांच्या पास वर विद्यार्थीचे घर ते परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानले जाणार आहे. तसेच त्यांना बसच्या पुढील दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच गर्दीच्या बस थांब्यावर पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. या कालावधीत बसमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासन काळजी घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध सुविधा दिल्या जात आहे.