पुण्यातील तापमानात २५ अंशाची तफावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील तापमानात 
२५ अंशाची तफावत
पुण्यातील तापमानात २५ अंशाची तफावत

पुण्यातील तापमानात २५ अंशाची तफावत

sakal_logo
By

पुणे, ता. ः पहाटे बोचरी थंडी अनुभवणाऱ्या पुणेकरांना दुपारी उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील हवामानातील परस्पर विरोधी स्थिती कायम असल्याने तापमानातील तफावत कायम आहे. गुरुवारी पहाटे किमान तापमान ९.४ अंशावर होते तर दुपारी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपार गेलेला होता. तापमानातील हा चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी पहाटे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाचा झळा असह्य होऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे किमान तापमानातील घट कायम असल्याने पहाटेच्या वेळी गारठादेखील टिकून आहे. राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानात वाढ कायम आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमान पस्तिशी पार आहे.