Thur, March 23, 2023

शहरात उन्हाचा चटका वाढला
शहरात उन्हाचा चटका वाढला
Published on : 17 February 2023, 3:14 am
पुणे, ता. १७ ः शहरातील कमाल तापमानात आता हळूहळू वाढ होत असून, दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा चटकाही कायम आहे. शुक्रवारी (ता. १७) शहरात कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या पुढे होते.
हवामानातील परस्पर विरोधी स्थिती कायम असल्याने शहरात तापमानातील तफावत कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आठवडाभर तरी शहरात ही स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.