पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल लंपास

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून एकाच्या खिशातील मोबाईल चोरला. कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन चौकात गुरुवारी (ता. १६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी बालाजी घुगे (वय ४३) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे टिळकनगर परिसरात राहण्यास आहेत. ते रात्री दुचाकीवरून घरी निघाले असता पाठीमागून दुचाकीवर तिघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी दुचाकी थांबवून त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला, पण त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या खिशातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पोबारा केला.