
फुरसुंगी भागात कोयता गँगची दहशत
पुणे, ता. १९ : हडपसरमधील फुरसुंगी परिसरात टोळक्याने घरे, गाड्यांवर दगडफेक करून दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एकाला तलवारी, कोयते उगारून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी ऋषभ हिवाळे (रा. काळेपडळ, हडपसर), रोहन कुदळे, अस्लम शेख, विक्रम जगधने, अक्षय कोळी, पवन भारती (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर गुंडीबा कांबळे (वय ४३, रा. संकेत विहार, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हिवाळे आणि साथीदारांनी फुरसुंगीतील ढेरे कंपनीजवळ कांबळे यांना अडवले. त्यांना तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने परिसरातील घरे तसेच गाड्यांवर दगडफेक केली. कांबळे यांच्या मुलावर टोळक्याने कोयता उगारून दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.