Tue, March 21, 2023

युद्धातील शौर्याबद्द्ल वळसंगकर यांचा सत्कार
युद्धातील शौर्याबद्द्ल वळसंगकर यांचा सत्कार
Published on : 20 February 2023, 10:25 am
पुणे, ता. २० ः बजाज अलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीतर्फे सशस्त्र दलातील युद्धात केलेल्या शौर्याच्या कामगिरीसाठी पुरस्कार प्राप्त निवृत्त अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हवाईदलातील माजी सैनिक मधुकर वळसंगकर यांचा सत्कार करण्यात आला. वळसंगकर यांनी भारत व पाकिस्तानच्या १९७१ मधील युद्धात केलेल्या कामगिरीसाठी हवाई दलाने त्यांना ‘पश्चिमी स्टार’ या पुरस्काराने गौरविले होते. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धातील अनुभव सांगितला.