
शिवजयंतीनिमित्त वडगावात आरोग्य शिबिर
धायरी, ता १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हेनेक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि समता शिक्षण संस्थेच्या उषा वाघ व अध्यक्ष विकास मस्के यांच्या संयुक्त विद्यमाने वडगावातील आश्रमात आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. जेम्स हॉस्पिटल अँड अँडोस्कोपिक सेंटरच्या डॉ. योगिता चव्हाण, कुलकर्णी डोळ्यांचे हॉस्पिटलचे डॉ. अमर कुलकर्णी आणि डॉ. डेंगळे क्लिनिकचे डॉ. अजित डेंगळे यांनी ही तपासणी केली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक विकास दांगट यांनी केले. राजाभाऊ बराटे, उमेश कोल्हे, साहेबराव मस्के, संविधान सन्मान परिषदेचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सोमनाथ हिवराळे, रमेश उंडे, बालाजी चंदनशिवे, राजू जानराव, मिनाज शेख, बाळासाहेब एडके, प्रणव दांगट, राहुल भणगे, शंकर मस्के, सुरेश आठवले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साहेबराव मस्के यांनी केले. देवानंद गडवे यांनी आभार मानले.