प्रीपेड रिक्षाचे चाक पुढे सरकेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीपेड रिक्षाचे
चाक पुढे सरकेना
प्रीपेड रिक्षाचे चाक पुढे सरकेना

प्रीपेड रिक्षाचे चाक पुढे सरकेना

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः पुणे रेल्वे स्थानकावरून प्रीपेड रिक्षा सुरू करण्याच्या केवळ चर्चाच आहे. प्रत्यक्षात सेवा उपलब्ध करण्याबाबत काही होत नाही. त्यामुळे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची लूट सुरु आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन वारंवार वाहतूक पोलिसांना प्रीपेड सेवा सुरु करण्याविषयी विनंती केली. मात्र, वाहतूक पोलिसांकडे ही सेवा सुरू करण्यासाठी सध्या तरी वेळ नाही. त्यामुळे प्रवासी व रेल्वे प्रशासन हतबल झाले आहे.

काय आहे स्थिती?
- पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट बस स्थानक व शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस स्थानक तीन ठिकाणी रिक्षाची प्रीपेड सेवा सुरु करण्याचे ठरले.
- तीन फेब्रुवारीला या संदर्भात काही संघटनांच्या प्रतिनिधीची वाहतूक पोलिसांसोबत बैठक देखील झाली.
- यावेळी एक आठवड्यात प्रीपेड रिक्षा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
- त्यांनतर पुढे काहीच झाले नाही.
- त्या दरम्यान रेल्वे प्रशासनकडे प्रवाशांच्या जास्तीचे दर आकारल्याच्या तक्रारी आल्या.
- त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून प्रीपेड रिक्षा सुरु करण्यासाठी पत्र व्यवहार केला.
- मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

तेव्हा जी २०, आता पोटनिवडणूक
या आधी देखील प्रीपेड रिक्षाचा विषय चर्चेला आला. त्यावेळी जी २० परिषद झाल्यानंतर पाहू असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. आता कसब्याची पोट निवडणूक झाल्यावर पाहू असे वाहतूक पोलिस सांगत आहे. त्यामुळे प्रीपेड सेवेला कधी मुहूर्त मिळणार हा अनुत्तरित प्रश्न आहे.

आहे त्याच जागी प्रीपेड बूथ
वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लोहमार्ग पोलिसांना पत्र पाठवून प्रीपेड रिक्षासाठी सध्याच्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावी अशी मागणी केली. पण, रेल्वे स्थानकाच्या परिसरात जागाच उपलब्ध नाही. तेव्हा दुसरी जागा कोठून उपलब्ध करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत असलेल्या ठिकाणाहूनच प्रीपेड रिक्षा सुरू करावी, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

सध्या आम्ही कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या कामात व्यस्त आहोत. निवडणुका संपल्यावर प्रीपेड रिक्षाच्या सेवेचा विचार करू.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पुणे