कसबा वगळता गुरुवारी 
काही भागात पाणी बंद

कसबा वगळता गुरुवारी काही भागात पाणी बंद

पुणे, ता. २० : समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध भागात फ्लो-मीटर बसविण्याचे काम केले जाणार असल्याने सदाशिव पेठेसह आठ पेठांमधील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. २३) बंद केला जाणार होता. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीत पेठांमधील पाणी बंद केल्याने आरडाओरडा होण्याच्या शक्यतेने महापालिका प्रशासनाने नियोजनात बदल करत पाणी बंद मधून कसब्यातील भाग वगळला आहे.

पाणी पुरवठ्याच्या टाक्यांमध्ये किती पाणी आले, किती पाणी गेले याचा हिशोब ठेवण्यासाठी फ्लो मीटर बसविण्याचे काम शहरात सुरू आहे. त्यामुळे दर गुरुवारी वेगवेगळ्या भागातील पाणी बंद ठेवून हे काम केले जात आहे. येत्या गुरुवारचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. पण यातून शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ हा भाग वगळला आहे. ज्या भागात पाणी बंद आहे, तेथे शुक्रवारी (ता. २४) उशिरा व कमी दाबाने पाणी येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

येथे पाणी पुरवठा बंद ः
जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत दुरुस्ती : एचइ फॅक्टरी, एमइए, वारजे जलशुद्धीकरण केंद्र : अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे. सणस पंपिंग स्टेशन : नऱ्हे गाव पूर्ण, मानाजी नगर, गोकुळ नगर, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर, धायरी गल्ली क्रमांक ब १० ते ब १४, झील कॉलेज परिसर. बकरी हिल आउट लेट ते ज्योती हॉटेल परिसर : वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम साळुंखे विहार रस्ता
रामटेकडी परिसर : ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ क्रमांक, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा, कोपरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com