विकासामुळे भाजप विजयी होईल : मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासामुळे भाजप विजयी होईल : मुंडे
विकासामुळे भाजप विजयी होईल : मुंडे

विकासामुळे भाजप विजयी होईल : मुंडे

sakal_logo
By

पुणे, ता. २० : ‘‘स्थिर सरकार आणि विकासाच्या मुद्यावर मतदार भारतीय जनता पक्षालाच मतदान करतील,’’ असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सरचिणीस पंकजा मुंडा यांनी येथे सोमवारी व्यक्त केला. ‘‘विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कसबा विधान सभा मतदार संघात प्रचार करत आहेत,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
कसबा विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, ‘‘कसबा मतदार संघात आतापर्यंत मतदारांनी भाजपलाच कौल दिला आहे. यावेळीही ते भाजपलाच यश देतील, यात शंका नाही. आम्ही सर्वजण पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठीच पक्षाचे सर्व नेते या मतदार संघात येत आहेत.’’ पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. माझा प्रचार बघवत नसणारे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करतात, असेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंडे म्हणाल्या, ‘‘शहा हे राष्ट्रीय नेते आहेत. ते पुण्यात प्रचारासाठी आले तर तर ते राज्याबाहेरचे कसा ठरतात?’’

बापट आले तर गैर काय?
पक्षाच्या सुरवातीपासून खासदार गिरीश बापट कार्यरत आहेत. ते सध्या आजारी आहेत. पण, अशा अवस्थेतही ते भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रासने यांच्या प्रचारासाठी आले तर त्याच गैर काय, असा सवाल मुंडा यांनी केला. आजारी असताना बापट प्रचारात आले, या घटनेचे राजकारण विरोधकांनी करणे चुकीचे आहे, असे मतही मुंढे यांनी व्यक्त केले.