दुबई मध्ये साजरा झाला शिव जयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुबई मध्ये साजरा झाला शिव जयंती उत्सव
दुबई मध्ये साजरा झाला शिव जयंती उत्सव

दुबई मध्ये साजरा झाला शिव जयंती उत्सव

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुबईमध्ये ‘एमपीएफएस’तर्फे भव्य शिवजयंती उत्सव साजरा झाला. मुलांनी महाराष्ट्राचा रांगडा, कणखर बाणा जपत, संस्कृती आणि परंपरेचा सुरेख मिलाफ घालत आपल्या कलागुणांद्वारे शिवकालीन इतिहासातील एक एक पान जिवंत केले. 
संयुक्त अरब अमिराती आणि भारताचे राष्ट्रगीत सभागृहात वाजवण्यात आले. मंडळाचे खजिनदार सुमेय यांनी बासरी वादन केले. अध्यक्ष देवेंद्र लवाटे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील प्रयोजन सांगितले. जवळपास २५ ते ३० कलाकारांनी आपली कला केली. मुलांचे नेत्रदीपक असे कलाविष्कार, विलक्षण पाठांतर, मराठी भाषेवरील प्रभुत्व, चिकाटी आणि प्रखर जिद्दीने आपले सादरीकरण पूर्णत्वास नेण्याची इर्ष्या दिसून आली. परदेशात राहत असताना जिथे मराठी हा  विषय अभ्यासक्रमात नसताना, संपूर्ण कार्यक्रम मराठी भाषेत करून मुलांनी महाराष्ट्राची अस्मिता मनापासून जपली. शिवशाहिरांचा पोवाडा, जिजाऊंचे स्वगत, ऐतिहासिक गोष्टींचे ओघवते कथन, पाळणा, नवीन चित्रपटातील जोशपूर्ण अशी पारंपरिक गाणी त्यावर सादर केलेली बहारदार नृत्य, पारंपरिक कविता अगदी प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राला लाभलेली कलेची विशाल परंपरा डोकावत होती.  आपल्या मातृभाषेची, संस्कृतीची, परंपरेची करून दिलेली ओळख जी मुलांना आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

PNE23T26291