शिक्षकेतर कर्मचारी कामावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकेतर कर्मचारी कामावर
शिक्षकेतर कर्मचारी कामावर

शिक्षकेतर कर्मचारी कामावर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बुधवारी कामावर परतले. मागील आठवडाभरापासून विविध मागण्यांसाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. बारावीच्या परीक्षा आणि सरकारच्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे.
राज्यातील अकृषिक विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रलंबित मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता. १६) त्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होत. याचा सर्वाधिक फटका शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसत होता. विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, सरकारला ११ मार्चचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांची परवड लक्षात घेता, तसेच मंत्रिमंडळ बैठकीच्या इतिवृत्तातील सकारात्मक बाब लक्षात घेता आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. जर सरकारने १० मार्चपर्यंत अध्यादेश काढला नाही, तर ११ मार्चपासून आम्ही पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारणार आहोत.
- डॉ. सुनील धिवार, उपाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती