Tue, March 28, 2023

सिद्धेश्वर पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी राजमाने
सिद्धेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजमाने
Published on : 22 February 2023, 1:38 am
पुणे, ता. २२ ः सिद्धेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर राजमाने आणि उपाध्यक्षपदी वैजनाथ शेटे यांची निवड झाली आहे.
पतसंस्थेची सहावी पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ या वर्षासाठी नुकतीच बिनविरोध झाली. संचालकपदी भारत काळे, सुहास पाटील, सुनील महाजन, राजू कळसकर, उमेश कावळे, मोनाली कुबडे, स्वाती लांडगे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून नीलेश बांदल यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सुधीर राजमाने यांची फेडरेशनच्या स्वीकृत संचालकपदी निवड केली आहे.