रोकड, मद्य मोठ्या प्रमाणात जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोकड, मद्य मोठ्या प्रमाणात जप्त
रोकड, मद्य मोठ्या प्रमाणात जप्त

रोकड, मद्य मोठ्या प्रमाणात जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदार संघात भरारी पथकाकडून साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत ४३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कसब्यात यापूर्वी पाच लाख तीन हजार ५००, तर दोन दिवसांपूर्वी साडेपाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख ५३ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
साडेपाच लाख रुपयांची रोकड स्वारगेट येथे भरारी पथकाने चारचाकीची तपासणी करून जप्त केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस करत आहेत. चिंचवडमध्ये ७३३६.१६ लिटर, तर कसब्यात ३१३.१८० लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अनुक्रमे चार लाख ९७ हजार ६२५ आणि २० हजार ६५० रुपये आहे. चिंचवडमध्ये ९४ हजार ७५० रुपये किमतीचे ३.५८४ ग्रॅम, तर पाच लाख रुपयांचे २५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, कसब्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) पाच तुकड्या, पोलिस १५००, तर चिंचवडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आयटीबीपीची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय शीघ्र कृती दलाच्या (आरपीएफ) दोन तुकड्या, ८३६ पोलिस, तर गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) १६९ कर्मचारी तैनात असणार आहेत. कसब्यात नऊ, तर चिंचवडमध्ये १३ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. कसब्यातील २७, तर चिंचवडमधील ५१ मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चिंचवडमध्ये १२ भरारी पथके, अवैध रोकड तपासणारी सात पथके, चित्रीकरण करणारी सहा, चित्रीकरण पाहणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे. कसब्यात भरारी आणि अवैध रोकड तपासणारी प्रत्येकी नऊ पथके, चित्रीकरण करणारी दोन, चित्रीकरण तपासणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे.