
‘एसएनडीटी’मध्ये रिमोट सेन्सिंगवर कार्यशाळा
पुणे, ता. २४ ः श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) भूगोल विभागाने २० फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ‘रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस प्रतिमानांचे संशोधनातील उपयोजन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन २० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या कुलगुरू. प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अरुण सराफ उपस्थित होते.
भूगोल विभाग प्रमुख व कार्यशाळेचे आयोजक प्रा. विरेंद्र नगराळे यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे सांगत व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण याबाबत रुपरेषा मांडली. या कार्यशाळेस देशभरातील २५ विद्यार्थी-विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे प्रा. अरुण सराफ यांनी भूगोल संशोधनातील अत्याधुनिक तंत्रज्ञान रिमोट सेन्सिंग, जीआयएस यांचे महत्त्व आणि सद्यस्थितीत व भविष्यकाळातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अत्यावश्यकता स्पष्ट केली. प्रा. शितल मोरे यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रगतीचा अहवाल सादर केला. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पूनम महेता देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रत्नप्रभा जाधव यांनी केले, तर प्रा. सचिन देवरे यांनी आभार मानले.