कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या
कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराची आज सायंकाळी सांगता झाली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री, नेते प्रचारात उतरवले होते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनदेखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील नेत्यांची फौज मैदानात होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अखेर आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजप महायुतीकडून हेमंत रासने आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात एकूण २८ जण निवडणूक लढवत आहेत.
कसब्यात भाजपने सभा, मेळावे, रोड शो केलाच; पण त्याचसोबत मते भाजपकडे वळविण्यासाठी राजकीय डावपेच रचून यंत्रणा कामाला लावली. काँग्रेसने विविध समाजाला महाविकास आघाडीसोबत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी प्रचार करून भाजपवर टीका केली. दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार शिगेला पोचल्यानंतर आज त्याचा समारोप झाला.