ट्रेझर पार्क सोसायटीत शिवाजी महाराज जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेझर पार्क सोसायटीत शिवाजी महाराज जयंती साजरी
ट्रेझर पार्क सोसायटीत शिवाजी महाराज जयंती साजरी

ट्रेझर पार्क सोसायटीत शिवाजी महाराज जयंती साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पुणे-सातारा रस्त्याजवळील संतनगर येथील ट्रेझर पार्क या सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ट्रेझर पार्क सांस्कृतिक मंडळ व सेंटर कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मशाल फेरीने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी शिवरायांचा जयघोष केला. त्यानंतर लेखक-साहित्यिक यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने संत तुकारामांचे अनन्य महत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी गेल्या ७० वर्षांतील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिव अॅड. घनश्याम खलाटे यांनी केले. डॉ. राहुल सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद गरड, नरेंद्र चौधरी, अतुल इटकरकर, निलम पाटील यांनी केले होते.