Sun, April 2, 2023

कोंढव्यात तरुणाला बेदम मारहाण
कोंढव्यात तरुणाला बेदम मारहाण
Published on : 26 February 2023, 3:50 am
पुणे, ता. २६ : पान टपरीवर गेलेल्या तरुणाला जुन्या वादातून बेदम मारहाण करीत त्याच्यावर कठीण वस्तूने वार केल्याची घटना एनआयबीएम परिसरात घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अमी मेमन ऊर्फ पापा (वय २१) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आमीर शेख (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिगारेट पिण्यासाठी टपरीवर गेले होते. त्यावेळी ओळखीतील अमी मेमन हा त्या ठिकाणी आला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली, तसेच ‘माझ्या मित्रासोबत का वाद केला’ असे, म्हणत वाद घालून त्याच्यावर कठीण वस्तूने वार केले.