निर्मल हाउसिंग सोसायटीतून कारचोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्मल हाउसिंग सोसायटीतून कारचोरी
निर्मल हाउसिंग सोसायटीतून कारचोरी

निर्मल हाउसिंग सोसायटीतून कारचोरी

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : औंधमधील निर्मल हाउसिंग सोसायटीतील एका सदनिकेतून चोरट्यांनी कारची चावी आणि त्याआधारे कार चोरल्याचा प्रकार घडला. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी सहा दरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी त्याच सोसायटीत आणखी तीन सदनिकांमध्ये चोरी केली.

याबाबत राहुल राजराव बेंदुगडे (वय २७, रा. औंध) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मानलेले वडील डॉ. आर. राजराव यांच्या फ्लॅट क्रमांक बाराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटे घरात घुसले. त्यानंतर कपाटातील साहित्य चोरीच्या उद्देशाने उचकटून अस्ताव्यस्त टाकले, तसेच टेबलवर ठेवलेल्या कारच्या दोन चाव्यांची चोरी करून पार्किंगमध्ये उभी केलेली कार चोरली.