सुनेत्रा मराठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनेत्रा मराठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सुनेत्रा मराठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सुनेत्रा मराठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः सुनेत्रा मराठे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘ब्रेसलेटचे गूढ आणि इतर कथा’ आणि ‘साखळी आणि इतर कथा’ या दोन गूढकथा संग्रहाचे नुकतेच झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका मीना प्रभू, ज्येष्ठ साहित्यिक वा. ल. मंजूळ, प्राचार्य श्याम भुर्के आणि माजी सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे उपस्थित होते. भुर्के म्हणाले, ‘‘मानवाला कथा फार प्रिय असते. त्यातून गूढकथा तर फारच आवडते. त्यामध्ये वाचकाला चकवा देणाऱ्या घटना, विचित्र मानवी स्वभाव, आपली हाव पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी यांचे वर्णन आढळते.’’ भामरे यांनी या कथा वाचकांच्या उत्कंठा वाढविणाऱ्या असल्याचे सांगितले. उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सुधाकर जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘कथक तरंग’ कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे, ता. २८ ः कथक नृत्यांगना आणि गुरू राजश्री जावडेकर यांच्या रचना डान्स अकादमी या संस्थेतर्फे ‘कथक तरंग’ हा नृत्य कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अकादमीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना, तीनताल, तराणा असे पारंपारिक नृत्यप्रकार तसेच फ्युजनसारखे आधुनिक नृत्यप्रकारही सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुरू राजश्री जावडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कृष्ण कीर्तन’ हे सादरीकरण त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांनी सादर केले. याप्रसंगी प्रतिमा दुरुगकर, डॉ. स्मिता जोग आदी उपस्थित होते.