‘प्राब’च्या ‘एक्झिट पोल’चा भाजपकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्राब’च्या ‘एक्झिट पोल’चा भाजपकडे कल
‘प्राब’च्या ‘एक्झिट पोल’चा भाजपकडे कल

‘प्राब’च्या ‘एक्झिट पोल’चा भाजपकडे कल

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता. २) लागणार आहे. तथापि, त्यापूर्वी निवडणुकीचा अभ्यास करणाऱ्या पुण्यातील प्राब (पोलिटिकल ॲनालिसिस अँड ब्युरो) या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजप विजयी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

यामध्ये प्रमुख मतदान केंद्रांबाहेर मतदारांशी बोलून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात विविध चर्चात्मक पद्धतींनी मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. कसब्यातील सदाशिव पेठ आणि चिंचवडमधील पिंपळे गुरव या ठिकाणी मतदारसंख्या जास्त आहे, त्याठिकाणी २ टक्के इतका तर कसब्यातील दत्तवाडी आणि चिंचवडमधील मामुर्डी या ठिकाणी जेथे मतदारसंख्या कमी आहे, अशा ठिकाणी १० टक्के इतका सॅम्पल साइज घेतल्याचे ‘प्राब’चे कार्यकारी संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघात ३२ टक्के मतदारांनी व्यक्ती पाहून तर ६८ टक्के मतदारांनी पक्ष पाहून मतदान केल्याचे तर, चिंचवडमध्ये ७० टक्के मतदारांनी व्यक्ती पाहून, तर ३० टक्के मतदारांनी पक्ष पाहून मतदान केल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

मतदानोत्तर चाचणी सर्वेक्षणातील पसंतीचे प्रमाण (कसबा पेठ)
क्रमांक उमेदवारचे नाव पक्ष पसंतीचे अंदाजे प्रमाण
१ रवींद्र हेमराज धंगेकर भारतीय राष्ट्रीयकाँग्रेस ४३.५२
२ हेमंत नारायण रासने भारतीय जनता पार्टी ४९.६९
३ आनंद कन्हैयालाल दवे अपक्ष १.८१
अन्य ४.९८

मतदानोत्तर चाचणी सर्वेक्षणातील पसंतीचे प्रमाण (चिंचवड)
क्रमांक उमेदवारचे नाव पक्ष पसंतीचे अंदाजे प्रमाण
१ अश्विनी लक्ष्मण जगताप भारतीय जनता पार्टी ४४.१३
२ विठ्ठल कृष्णाजी काटे राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी ३९.२७
३ राहुल तानाजी कलाटे अपक्ष ११.४५
अन्य ५.१५