लोकशाहीत उदासीनता, मग जनआंदोलन का नाही? उल्हास पवार : जयदेव गायकवाड व विजय जाधव यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकशाहीत उदासीनता, मग जनआंदोलन का नाही? 
उल्हास पवार : जयदेव गायकवाड व विजय जाधव यांचा सत्कार
लोकशाहीत उदासीनता, मग जनआंदोलन का नाही? उल्हास पवार : जयदेव गायकवाड व विजय जाधव यांचा सत्कार

लोकशाहीत उदासीनता, मग जनआंदोलन का नाही? उल्हास पवार : जयदेव गायकवाड व विजय जाधव यांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : १९७०-८० च्या दशकात महाराष्ट्रातील युवकांनी वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने केली. ते दशक युवकांच्या वैचारिक आंदोलनाचे पर्व ठरले. आज देशात प्रचंड महागाई आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. लोकशाहीत उदासीनता आहे. मग आंदोलने का केली जात नाहीत, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर व ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’च्या वतीने माजी आमदार जयदेव गायकवाड व विजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बुधवारी (ता. १) पत्रकार भवन येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार जयदेव गायकवाड, विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, एम. बी. वाघमारे, भारती गायकवाड, पंडित कांबळे, विजय पुरे, चंद्रकांत जगताप, मनोहर जाधव आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘मी दलित पँथरच्या चळवळीचा साक्षीदार आहे. नामदेव ढसाळ यांच्याविषयी आठवणी सांगताना ते म्हणाले, माझे आणि नामदेव यांचे अगदी जवळचे संबंध होते. जेव्हा त्यांच्या घरी जात त्यावेळी ते पुस्तकात रमलेले दिसत होते. जसे वाचन महत्त्वाचे आहे, तसे माणसांनी बहुश्रुतदेखील असले पाहिजे. गायकवाड म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते. ते मानवी मूल्यांसाठी लढणारे नेते होते. समाज एका पातळीवर यावा, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. चळवळीतील कार्यकर्त्यांनी समता, न्याय ही मूल्ये जोपासली पाहिजेत. डॉ. आंबेडकर हे खरंच आपल्याला समजले का? त्यांचे आकलन झाले का? असा प्रश्न स्वतःला विचारून बघा. डॉ. आंबेडकर समजून घेण्यासाठी त्यांचे ज्ञानाची कास धरायला हवी.’’ विजय जाधव यांनीही दलित पँथरच्या आठवणींना उजाळा दिला. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

२७८७०