
‘प्रायमस’चे प्रकल्प आता मुंबईत
पुणे, ता. १ : ज्येष्ठ नागरिक निवासी व निवृत्ती समुदायांचा विकास करण्यात आघाडीवर असलेल्या प्रायमस या कंपनीने मुंबईच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नागरिक निवासी क्षमतेत दोन हजार युनिट्सची, भर घालण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रवेश हा बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे यानंतर चौथा शहरी महानगर प्रकल्प आहे. सध्या प्रायमसची ७०० हून अधिक घरे कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या तीन महानगरांमध्ये पसरलेली आहेत. मुंबईत प्रवेशासह, आपल्या घरांच्या संख्येत आणखी ४५० घरांची भर घालण्याची कंपनी इच्छा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक निवासांची संख्या एक हजार १५० वर जाणार आहे. तर ९०० घरांचे काम सुरू आहे. याबाबत प्रायमस सीनियर लिव्हिंगचे व्यवस्थापकीय संचालक आदर्श नरहरी या वेळी म्हणाले, ‘‘मुंबई महानगर प्रदेशातील वयस्करांना आमच्या सेवा देऊ करताना आम्हाला आनंद होत आहे. निवृत्त समुदायामध्ये राहण्याच्या लाभांची तसेच बदलत्या मानसिकतेची सखोल समज आमच्याकडे आहे. त्यामुळेच आम्ही वाढ साध्य केली आहे. कोरोनाच्या साथीमुळे आमच्या व्यवसायाला खूप वेग आला, कारण, पारंपरिक रचनेत राहणाऱ्या वृद्धांच्या समस्या या काळात सर्वांच्या लक्षात आल्या. आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही प्रोत्साहित झालो आहोत.’’