नृत्य अन् सहवादनाचा अनोखा मिलाफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृत्य अन् सहवादनाचा अनोखा मिलाफ
नृत्य अन् सहवादनाचा अनोखा मिलाफ

नृत्य अन् सहवादनाचा अनोखा मिलाफ

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः व्हायोलिन व सतारच्या सुरेल वादनासह कथक व भरतनाट्यम नृत्यरचनांचा मेळ साधत सादर केलेल्या कलाविष्काराने अनोख्या सांगीतिक मैफलीचा आनंद रसिकांनी अनुभवला. निमित्त होते, गानवर्धन आणि एनसीपीए यांच्यातर्फे आयोजित ‘सुरेल संवाद’ कार्यक्रमाचे.
या वेळी जया जोग आणि नीलिमा राडकर यांचे सतार आणि व्हायोलिनचे सहवादन झाले. त्यांनी राग यमन कल्याणमध्ये उस्ताद उस्मान खाँ यांच्या दोन रचना सादर केल्या. त्यानंतर त्यांच्या शिष्यांसह पारंपारिक गणेशस्तवन, राग बैरागीमध्ये निरामय, राग भूपमध्ये ज्योतीकलश, राग चंद्रकंसमध्ये रत्नदीपिका आदी वाद्यवृंद रचना सादर केल्या. मानसी दांडेकर, ऐश्वर्या भावे, प्रज्ञा मेने या शिष्यांनी सतार आणि पल्लवी ताम्हनकर, मृदुला साठे, दीपा कुडतरकर यांनी व्हायोलिनसाठी सहवादन केले. केदार तळणीकर व अक्षय पाटणकर यांनी तबल्यावर साथ केली.
नीलिमा राडकर यांच्या ‘हे अधिनायक’ आणि जया जोग यांच्या काफी रागाधारित रचनांवर ऐश्वर्या साने-थत्ते, रमा कुकनूर यांनी कथक व भरतनाट्यम नृत्यरचना सादर केल्या. सर्व कलाकारांचा सत्कार उद्योजक सुहास ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. वासंती ब्रम्हे यांनी निवेदन केले. या वेळी ‘गानवर्धन’चे अध्यक्ष दयानंद घोटकर, कार्याध्यक्ष रवींद्र दुर्वे, सानिया पाटणकर, डॉ. राजश्री महाजनी, डॉ. विद्या गोखले, सुजाता लिमये, सविता हर्षे, जयंत देवधर आदी उपस्थित होते.