पुनरावृत्ती...३२ वर्षांपूर्वीची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनरावृत्ती...३२ वर्षांपूर्वीची!
पुनरावृत्ती...३२ वर्षांपूर्वीची!

पुनरावृत्ती...३२ वर्षांपूर्वीची!

sakal_logo
By

पुणे, ता. २ : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला आहे. यापूर्वीही कसब्यात १९९१ ला कसब्यातील पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे या आजच्या निकालाने पुन्हा एकदा ३२ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती झालेली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र सुरवातीपासूनच होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसने मोठी ताकद या मतदारसंघात लावलेली होती. मात्र, प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली. अखरेच्या २०व्या फेरीनंतर त्यांनी १० हजार ९५० मतांनी पराभव केला.
१९९१ ला भाजपचे आमदार अण्णा जोशी हे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. त्यामुळे १९९१ झाला पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये भाजपकडून गिरीश बापट यांना संधी देण्यात आली होती, तर काँग्रेसने वसंत ऊर्फ तात्या थोरात यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूकही चुरशीची झाली होती, त्यावेळी गिरीश बापट यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी थोरात यांनी पराभव केला होता. त्यानंतर १९९५ मध्ये बापट यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर ते २०१४ पर्यंत सलग पाच वेळा कसब्यातून आमदार म्हणून निवडून विधानसभेत गेले. तर २०१९ मध्ये भाजपकडून मुक्ता टिळक या विजयी झाल्या. टिळक यांचे निधन झाल्याने २०२३ मध्ये ही पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली. पण यामध्ये भाजपचे रासने यांचा पराभव झाल्याने १९९१ ची पुनरावृत्ती झाली. कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी काँग्रेसला तब्बल ३२ वर्ष वाट पहावी लागली आहे.