
‘पीएमपी’कडून दंड रक्कम तीनशेवरून पाचशे रुपये
पुणे, ता. ३ ः ‘पीएमपी’मधून प्रवास करणे प्रवाशांना आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. पूर्वी तीनशे रुपये असणारा दंड आता पाचशे रुपये करण्यात आला आहे. १० मार्चपासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
‘पीएमपी’च्या बसमधून मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. दर महिन्याला किमान तीन ते चार हजार प्रवासी मोफत प्रवास करतात. बसमधील गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आलेले आहेत. प्रवासी जवळच्या अंतरासाठी तिकीट न काढता प्रवास करीत आहे. यात पुण्यदशमच्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे ‘पीएमपी’च्या उत्पन्नात घट होत आहे. होणारी घट कमी करण्यासाठी व फुकट्या प्रवाशांना आळा बसावा म्हणून पीएमपी प्रशासनाने १० मार्चपासून दंडाची रक्कम वाढवली आहे.