पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता
पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता

पुण्यात ढगाळ हवामानाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या अंदाजामुळे पुणे शहरातही शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) शहरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
शहरात उन्हाळा हंगामाला सुरुवात झाल्याने कमाल तापमानात सातत्याने वाढ होऊन उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. शुक्रवारी शहरातील सरासरी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमानही १५ अंशाच्या वर नोंदविले गेले. कमाल आणि किमान तापमानातील हा फरक आता कमी होत असून, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात एक-दोन अंशाची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शुक्रवारी राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. यातच शनिवारपासून (ता. ४) उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. आज उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.