महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला कर्मचाऱ्यांना 
अर्ध्या दिवसाची सुट्टी
महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. पण, महापालिका प्रशासनाने प्रथमच महिला सेविकांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देऊन विशेष भेट दिली आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र बिनवडे यांनी याबाबत असा लेखी आदेश दिला आहे.
दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, विविध क्षेत्रातील महिलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार समारंभ आयोजित केले जातात. पुणे महापालिकेतही कार्यक्रम होतात. महिला दिनानिमित्ताने पीएमपीनेही तेजस्विनी बसमध्ये महिला प्रवाशांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. पुणे महापालिकेने काम करणाऱ्या वर्ग एक ते तीन मधील महिला कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यांना दुपारी तीननंतर कामातून सवलत देण्यात येणार आहे. तर वर्ग चारच्या महिला सेविका शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून कामावर असतात. त्यामुळे त्यांना सकाळी साडे दहा नंतरच सुट्टी देण्यात आली आहे, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.