रेल्वेचे बुकिंग रद्द करणे पडले साडेतीन लाखांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेचे बुकिंग रद्द करणे पडले साडेतीन लाखांना
रेल्वेचे बुकिंग रद्द करणे पडले साडेतीन लाखांना

रेल्वेचे बुकिंग रद्द करणे पडले साडेतीन लाखांना

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग रद्द करताना योग्य खबरदारी न घेणे एका ज्येष्ठ दांपत्याला चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी या दांपत्याच्या बॅंक खात्यातून परस्पर तीन लाख ४४ हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी यतीन यशवंत रेडकर (वय ६९, रा. औंध) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेडकर यांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावर त्यांचे रेल्वेचे तिकीट बुक केले होते. काही कारणास्तव तिकीट रद्द करण्यासाठी त्यांनी गुगलवर क्रमांक सर्च केला. त्यावेळी एका क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावर अनोळखी व्यक्तीने रेडकर यांना लिंक पाठवली. ती लिंक क्लिक केल्यानंतर फिर्यादी रेडकर आणि त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यातून तीन लाख ४४ हजार रुपये परस्पर काढून घेतले.
या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिकीट रद्द करणे अपेक्षित होते. परंतु गुगलवर क्रमांक शोधून अनोळखी व्यक्तीशी संपर्क केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.