
एलनच्या पुण्यातील आठ विद्यार्थ्यांची ‘ओसिएससी’साठी निवड
पुणे, ता. ७ : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनने (एचबीसीएसई) विविध ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेनंतर पुढील टप्प्यातील ‘ओरिएंटेशन कम सिलेक्शन कॅम्प’साठी (ओसिएससी) यादी जाहीर केली आहे. यामध्ये एलन पुण्याच्या आठ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्राविण्य मिळविले.
ध्रुव शाह, ऋषभ कौटेचा (भौतिकशास्त्र), तन्मय भंडारी आणि हेतल पंकज अग्रवाल (जीवशास्त्र) यांची तर आयुष कुठारी आणि विहंग विनोद विदवंश (खगोलशास्त्र ज्युनिअर ऑलिम्पियाड), शौर्य अग्रवाल (गणित) आणि शिव पांचाळ (ज्युनिअर सायन्स) यांची निवड निश्चित झाली आहे. ‘एलन पुणे केंद्रा’चे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘केंद्रातील विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसोबतच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्येही सातत्याने यश मिळवत आहेत. एचबीसीएसईमध्ये एप्रिल-मे महिन्यांत सर्व विषयांसाठी वेगवेगळ्या कालावधीत शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरानंतर सर्व विषयांचे वेगवेगळे भारतीय संघ निवडले जाणार आहेत. हे संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.’’