महाराष्ट्र पर्यटन बर्लिन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र पर्यटन बर्लिन बातमी
महाराष्ट्र पर्यटन बर्लिन बातमी

महाराष्ट्र पर्यटन बर्लिन बातमी

sakal_logo
By

बर्लिन व्यापार मेळाव्यात
राज्यातील पर्यटनाचा प्रचार
मुंबई, ता. ९ ः महाराष्ट्र पर्यटन विभाग जागतिक बाजारपेठेत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात सहभागी झाला होता. हा मेळावा ७ ते ९ तारखादरम्यान झाला. देशातील तिसरे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे असून, ती जगभरातील पर्यटनाचे आकर्षण ठरू शकतात. राज्याची राजधानी मुंबई ही खऱ्या अर्थाने देशाचे प्रवेशद्वार आहे व राज्याला निळेशार समुद्र किनारे आहेत. निरभ्र आकाशाची देणगी मिळालेली आहे. त्यामुळे समृद्ध वारसा, संस्कृती, निर्सग, समुद्र किनारे व जंगले पाहण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्वकाही उपलब्ध होते. आयटीबी बर्लिनमध्ये १६१ देशातील ४०० वक्ते व २०० पॅनेल्सनी प्रतिनिधित्व केले. येथे महाराष्ट्राचे विशेष दालन होते व तेथे अजंठा व वेरुळच्या शिल्पकलेचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. मेळाव्यामुळे राज्यातील शिष्टमंडळाला जर्मन पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटण्याची, चर्चा करण्याची व व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या दालनाचे उद्‍घाटन भारतीय पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग यांनी केले. या वेळी भारतीय दूतावासातील राजदूत पी. हरीश उपस्थित होते.