विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

भावे स्कूलमध्ये महिला दिन साजरा
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भावे प्रशालेत महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दहा महिलांचा स्मृतीचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाला समिती अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी महिलांच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी सन्मानार्थी महिलांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवनकुमार वर्मा यांनी केले.

माजी विद्यार्थ्यांकडून झेरॉक्स मशिन
पुणे : भावे प्रशालेच्या १९५८-५९ बॅचमधील माजी विद्यार्थी व ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर आणि त्यांच्या मित्रांनी प्रशालेस झेरॉक्स मशिन भेट म्हणून दिली. यावेळी मुख्याध्यापक बी. डी. शिंदे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिलेल्या मदतीबाबत भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष आनंद कुलकर्णी आणि पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी डॉ. केळकर यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

‘पीईएस’मध्ये महिला पालकां सन्माम
पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्या मंदिर (गणेशखिंड) यांच्यातर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० महिला पालकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक दीपाली पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष दीपक मराठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य विठ्ठल मोहोळ, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता खटावकर उपस्थित होते. शाळेतील शिक्षक डॉ. भानुदास कुलाळ यांनी स्त्री जीवनावर आधारित पद्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मस्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका प्रिया धोत्रे यांनी केले.

शिक्षिकांचा सत्कार
पुणे : भारती विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये (धनकवडी) आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षिका अलका लाड, नीलम धर्माधिकारी, अनिता जगताप, अश्विनी जंगम, रेश्मा शेख आदी शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. सर्व शिक्षिकांचा विद्यालयाचे प्राचार्य विकास आबदर यांनी सत्कार केला. शिक्षक सुनील भालेराव, अनिता शेरकर, बाळासाहेब सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बिचुकले यांनी केले. तर लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन
पुणे : धनकवडी येथील भारती विद्यापीठ कन्या प्रशालेत भारती विद्यापीठाचे संस्थापक व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कन्या प्रशालेच्या इन्चार्ज अनिता भोई, पर्यवेक्षक शशिकांत देशमुख यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीतील काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत डोंब यांनी, तर सूत्रसंचालन सुलोचना कोळी यांनी केले.