
भालचंद्र वडके यांचे निधन
भालचंद्र वडके यांचे निधन
पुणे, ता. १० : भालचंद्र वासुदेव वडके (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, नातवंडे, बहीण, भाऊ असा परिवार आहे. त्वष्टा कासार समाज संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. त्वष्टा कासार समाजाच्या आळंदी व पंढरपूर येथील धर्मशाळा उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. शिवसेना नेते काका वडके यांचे ते पुतणे होत.
दिगंबर औटे यांचे निधन
पुणे, ता. १० ः दिगंबर औटे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गंधर्व म्युझिकल्स फर्मचे ते मालक होते.
प्रभाकर देवभानकर यांचे निधन
पुणे, ता. १० : वास्तुविशारद प्रभाकर रामराव देवभानकर (वय ९३) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई आणि नाती असा परिवार आहे. रोटरी क्लब पुणे(मुख्य)चे ते माजी अध्यक्ष होते.
(सर्व फोटो - हार्ड कॉपी)