Sun, April 2, 2023

नवीन फलाटावरील
फरशा उखडलेल्या
नवीन फलाटावरील फरशा उखडलेल्या
Published on : 11 March 2023, 3:34 am
पुणे, ता. ११ ः शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरच्या नवीन फलाटावरच्या फरशा उखडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेतून फलाटावर उतरताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य आनंद सप्तर्षी यांनी याची तक्रार करून संबंधित कामाची चौकशीची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्थानकावर नवीन फलाट तयार केला. फेब्रुवारी महिन्यात या फलाटाचे उद्घाटन होऊन ते वापरात आले. याला महिना होण्याच्या आधीच फलाटावरच्या फरशीचे काम उघडे पडले आहे. येत्या काळात या स्थानकावरून प्रवाशांची संख्या वाढणार आहे. तेव्हा तुटलेल्या फरशांमुळे प्रवासी ट्रॅकवर पडून अपघात घडण्याची शक्यता आहे.