Tue, March 21, 2023

‘पुणे बुक फेअर’ प्रदर्शनाला प्रतिसाद
‘पुणे बुक फेअर’ प्रदर्शनाला प्रतिसाद
Published on : 12 March 2023, 3:21 am
पुणे, ता. १२ ः येरवडा परिसरामध्ये आयोजित पुणे बुक फेअर पुस्तक प्रदर्शन नुकतेच पार पडले. या पुस्तक प्रदर्शनासह कवी संमेलन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कवी दीपक करंदीकर, ‘क्रिएटी सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.महेश, हिंदू ग्रुपचे एन. वैद्यनाथन हे विशेष पाहुणे म्हणून, तर पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दीपक करंदीकर उपस्थित होते. याप्रसंगी लेखकांशी गप्पा, कवी संमेलन आयोजित केले होते. प्रदर्शनात नामवंत संस्थांनी त्यांच्या पुस्तकांचे स्टॉल्स मांडले होते. विशेषतः शैक्षणिक पुस्तकांच्या स्टॉल्सची संख्या सर्वाधिक होती.