अनुराग ठाकूर यांची चित्रपट संग्रहालयाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुराग ठाकूर यांची
चित्रपट संग्रहालयाला भेट
अनुराग ठाकूर यांची चित्रपट संग्रहालयाला भेट

अनुराग ठाकूर यांची चित्रपट संग्रहालयाला भेट

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी (ता. ११) पुणे दौऱ्या दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
‘‘भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना ‘राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान’ हे नवसंजीवनी देत आहे. यामार्फत पूर्वी सहजपणे उपलब्ध नसलेले अनेक चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम दर्जा राखून उपलब्ध करून दिले जातील. तसेच पुढील शंभर वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी भारतीय चित्रपटांचे दीर्घकालीन जतन खात्रीने केले जाईल’’, असे यावेळी ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांनी संग्रहालयाच्या संकुलात नव्याने उभारलेल्या चित्रपट संवर्धन प्रयोगशाळेचीही पाहणी केली. या ठिकाणी सेल्युलॉइड रील्स संवर्धनाचे काम सुरु आहे.