Tue, March 28, 2023

पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
Published on : 12 March 2023, 3:57 am
पुणे, ता. १२ : पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी जारी केले आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांची गुन्हे शाखेच्या युनिट एकपदी बदली केली आहे. वाहतूक शाखेतील वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांची फरासखाना पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची कोंढव्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.