Mon, March 27, 2023

‘टेक्नोव्हिजन २०२३’मध्ये १०० विद्यार्थ्यांचा सहभाग
‘टेक्नोव्हिजन २०२३’मध्ये १०० विद्यार्थ्यांचा सहभाग
Published on : 13 March 2023, 10:03 am
पुणे, ता. १३ ः ‘एआयएसएसएमएस’ तंत्रनिकेतनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘टेक्नोव्हिजन २०२३’ तांत्रिक शोध निबंध स्पर्धेत राज्यातील विविध तंत्रनिकेतनमधील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कॉम्पुटर, मॅकेनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या विभागाअंतर्गत तांत्रिक शोध निबंध सादर झाले. परीक्षक म्हणून शैक्षणिक तसेच औद्योगिक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती. चार विभागाअंतर्गत प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक १५०० रुपये, व्दितीय पारितोषिक १००० रुपयांचे देण्यात आले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. के. गिराम यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.