वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील
पाच आरोपींना अटक
वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

sakal_logo
By

पुणे : गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून फरार असलेल्या पाच आरोपींना पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने सापळा रचून अटक केली. हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील असून, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
साहिल ऊर्फ चपटा अकबर शेख (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर), गणेश मानसिंग पवार (वय २८, रा. कोंढवा), सुनील मारुती साळवे (वय ३९, रा. उंड्री पिसोळी), रोशर सुरेश घाडगे (वय २१) आणि जगदीश सोमनाथ घाडगे (वय २२, दोघे रा. मोरे वस्ती, मांजरी फार्मजवळ, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

साहिल हा खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार होता. तर गणेश पवार वाहन चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यात पसार होता. त्यासोबतच बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी सुनील साळवेला पकडले गेले आहे. तर मारहाणीच्या गुन्ह्यात रोशर घाडगे व जगदीश घाडगे हे पसार होते. या दरम्यान पोलिस अंमलदार आनंद पाटोळे व राजू कदम यांनी मारहाणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेले रोशर घाडगे व जगदीश घाडगे यांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले, ज्योतिष काळे यांच्या पथकाने केली.