गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः कमाल तापमानात झालेली वाढीमुळे कोकणात उष्णतेची लाटेची स्थिती कायम असून उर्वरित राज्यात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी (त. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. १३) राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ३८.८ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे तर नीचांकी तापमान पुणे येथे १६.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान हे ३५ ते ३८ अंशांच्या दरम्यान आहे. त्यातच ढगाळ वातावरणाच्या स्थितीमुळे किमान तापमानाचा पारा ही चढू लागला आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत कमी झाली आहे.
सध्या राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरणाची स्थिती झाली असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात होणार आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचे कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
शहर आणि परिसरातही अधूनमधून ढगाळ वातावरणाचे सावट पाहायला मिळत आहे. पुढील आठवडाभर पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तसेच बुधवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. १७) या कालावधीत जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सोमवारी शहरात ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.