कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत राजू शेट्टींची ‘एनजीटी’त तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत 
राजू शेट्टींची ‘एनजीटी’त तक्रार
कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत राजू शेट्टींची ‘एनजीटी’त तक्रार

कृष्णा नदीतील प्रदूषणाबाबत राजू शेट्टींची ‘एनजीटी’त तक्रार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : कृष्णा नदीतील प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) तक्रार दाखल केली आहे. या याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज कुपवाड महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहत आणि साखर कारखान्यांतून मळीमिश्रित पाणी विनाप्रक्रिया कृष्णा नदीपात्रात सोडले जात आहे. नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आले आहेत. नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत होत आहेत. प्रक्रिया न करता महापालिकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडले जाते. कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही. दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते, असा आरोप याचिकाकर्ते शेट्टी यांनी याचिकेतून केला आहे. अॅड. असीम सरोदे, अॅड. गौतम कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने ‘एनजीटी’चे न्यायाधीश डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्यासमोर होर्इल. सांगली महापालिकेने याबाबत काय कारवार्इ केली आहे, याची माहिती मिळावी. प्रदूषित पाणी नदीत सोडणारा कारखाना बंद करावा. सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित कारखान्यांना पुरविण्यात येत असलेली वीज आणि पाणीपुरवठा बंद करावा. कारवार्इ नाही केली म्हणून सांगली महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच प्रदूषणास जबाबदार असलेल्यांना मोठा दंड करावा, अशी मागणी याचिकेतून केली आहे.