महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष नको ः डॉ. नांदेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष नको ः डॉ. नांदेडकर
महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष नको ः डॉ. नांदेडकर

महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष नको ः डॉ. नांदेडकर

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः ‘‘आहारापासून आजारपणापर्यंतच्या सगळ्याच बाबतीत संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या महिलांच्या आरोग्याकडे मात्र त्या स्वतः दुर्लक्ष करतात. महिलांना सृजनाचे वरदान मिळाले असून महिलांच्या मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे हे संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते,’’ असे मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अनुयश आरोग्य प्रतिष्ठान''तर्फे आयोजित ‘मधुसंवाद’ कार्यक्रमात ‘मधुमेह आणि महिलांचे आरोग्य’ याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. नांदेडकर बोलत होते. माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त विलास नेवपूरकर, ‘मधुसंवाद’च्या समन्वयक ममता क्षेमकल्याणी आदी उपस्थित होते.
डॉ. नांदेडकर म्हणाले, ‘‘कौटुंबिक इतिहास, चुकीची जीवनशैली आणि ताणतणावांमुळे महिलांना टाइप २’ प्रकारच्या मधुमेहाचा सामना करावा लागतो. महिलांच्या आरोग्याकडे आणि त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्याचा मोठा परिणाम मधुमेहाच्या उपलब्ध आकडेवारीवर आणि महिलांच्या शरीरावर होताना दिसतो. त्यामुळे महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते.’’