Fri, March 31, 2023

कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात
कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात
Published on : 14 March 2023, 1:31 am
पुणे, ता. १४ : शिवसाई युथ फाउंडेशनतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा कोथरूडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मर्दानी खेळाने कार्यक्रमाची सुरवात झाली. युवा शाहीर श्रीकांत शिर्के यांनी पोवड्यांचा कार्यक्रम सादर केला. उपस्थित महिलांनी शिवजन्माचा पाळणा गायला. त्यानंतर महाराजांची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन पगडे, ओमकार जाधव, संकेत पवार, अनिकेत सकटे आदींनी प्रयत्न केले. नीरज कुटेकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थापक अध्यक्ष साईराज पगडे यांनीही मार्गदर्शन केले.